बांधकाम कामगारांना अनेक योजनांचा लाभ मिळतो, जसे की शैक्षणिक योजना, सामाजिक योजना, आरोग्य योजना आणि अटल बांधकाम कामगार घरकुल योजना अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार कार्ड काढावे लागत. बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी ? याची माहिती या पोस्टमध्ये घेणार आहोत.
Bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra
बांधकाम कामगार नवीन अर्ज, नूतनीकरण अर्ज, लाभाचे अर्ज आणि दुरुस्ती अर्ज आता सर्व कामे तालुकास्तरावर बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी होणार आहेत. यापूर्वी ही सर्व कामे ऑनलाइन वेबसाईटवरून करता येत होती परंतु आता सर्व कामे बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र मध्ये होणार आहेत.
बांधकाम कामगार नवीन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बांधकाम कामगाराने 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
ही कागदपत्रे घेऊन बांधकाम कामगारांनी तालुकास्तरावर असलेल्या बांधकाम कामगार सुविधा केंद्र मध्ये जायचे आहे येथे तुम्ही बांधकाम कामगार नोंदणीसाठी मोफत अर्ज करू शकता. येथे तुमच्याकडून फी आकारली जाणार नाही. बांधकाम कामगार कार्ड अगदी मोफत दिली जाणार आहे. बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र मध्ये बांधकाम कामगार नोंदणी, बांधकाम कामगार नूतनीकरण, तसेच बांधकाम कामगारांना असणाऱ्या सर्व योजनांचे अर्ज, इत्यादी सेवा संपूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत. तालुका सुविधा केंद्र मध्ये बांधकाम कामगारकडून पैसे घेतले जाणार नाहीत. त्यांच्याकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही संपूर्ण सेवा मोफत दिली जाणार आहे.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी 32 पेक्षा जास्त योजना राबवल्या जातात.