बांधकाम कामगार असाल तर महत्त्वाची बातमी, आता सर्व कामे येथे होणार



 बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र

बांधकाम कामगार योजना नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. बांधकाम कामगार नवीन नोंदणी, नूतनीकरण, लाभाचे अर्ज आणि दुरुस्ती आता सर्व कामे बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्रामध्ये होणार आहेत. 

बांधकाम कामगार योजना 

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मजूर तसेच कारागीर कामगारांना महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजनांचा लाभ दिला जातो. लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ यांच्याकडे अधिकृत नोंदणी केलेली असावी लागते. तसेच बांधकाम कामगार कार्ड ऍक्टिव्ह असावे लागते. बांधकाम कामगारांना सामाजिक योजना, आरोग्य योजना, शैक्षणिक योजना अशा प्रकारच्या अनेक कल्याणकारी योजनाचा लाभ मिळतो. 

यापूर्वी स्वतः बांधकाम कामगार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत होता. परंतु आता सर्व कामे बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र मध्ये होणार आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post