नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. जे शेतकरी पीएम किसान योजनेस पात्र होतील त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे ही सहा हजार रुपये वार्षिक दिल्ली जातात. या दोन्ही योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळतात. पी एम किसान योजनेसाठी नवीन अर्ज कसा करावा याची माहिती या पोस्टमध्ये घेणार आहोत.
पीएम किसान योजना नवीन अर्ज कसा करावा ?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावावर शेती असणे आवश्यक असते. पीएम किसान योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी पीएम किसन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. pmkisan.gov.in सी पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही पी एम किसान योजनेसाठी नवीन अर्ज करू शकता तसेच ज्या शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत त्यामध्ये दुरुस्तीचा ही अर्ज करू शकता.
एम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
शेतीचा सातबारा
शेतीचा खाते उतारा
शेतीचा फेरफार उतारा
(वरील सर्व कागदपत्रे तलाठी सही किंवा डिजिटल सही असलेल असावेत)
शेतकऱ्याचे आधार कार्ड
(शेतकऱ्याच्या आधार कार्डास मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
मोबाईल नंबर
शेतकऱ्याच्या आधार कार्डात बँक पासबुक लिंक असणे आवश्यक.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
पी एम किसान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर. फार्मर न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा. यानंतर शेतकऱ्याचे आधार कार्ड , मोबाईल नंबर टाकून, मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून घ्या. यानंतर फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म भरून वरील सर्व कागदपत्रे 200 के बी पी डी एफ मध्ये टाकून सबमिट करा.